अस्मिता खेलो इंडिया: नागपूर महिला क्रीडा स्पर्धा यशस्वी

नागपूर,

आज महाराष्ट्रातील नागपूर येथे अस्मिता खेलो इंडिया अंतर्गत आयोजित महिला क्रीडा स्पर्धेचे भव्य व यशस्वी आयोजन करण्यात आले होते . 

या स्पर्धेने महिला क्रीडापटूंना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यास आणि आपली गुणवत्ता अधिक सक्षमपणे प्रदर्शित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ  मिळाले .  अशा उपक्रमांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना आपली क्षमता व कौशल्य दृढपणे सादर करण्याची संधी मिळते.

आयोजनातील सर्व व्यवस्था अत्यंत सुयोग्य व प्रशंसनीय राहिल्या. स्पर्धकांसाठी सुरक्षित, अनुकूल व प्रेरणादायी वातावरण निर्माण करण्यात आले होते, ज्यासाठी संपूर्ण आयोजन समिती विशेष कौतुकास पात्र आहे.या स्पर्धेत आमची “लेडी लॉयर्स टीम” ने देखील उत्साहपूर्वक सहभाग नोंदविला. आमच्या टीमसाठी हा अनुभव अत्यंत प्रेरणादायी ठरला. भविष्यातही अशा सर्व उपक्रमांमध्ये संपूर्ण समर्पण व ऊर्जा घेऊन सहभागी होण्याचा आमचा निर्धार आहे.

अशा प्रकारच्या स्पर्धा महिलांच्या सशक्तिकरणला नवी दिशा देतात.  केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्यास प्रोत्साहित करतात.

 स्मिता दीक्षित