राष्ट्रीय पोषण महिना २०२६ अंतर्गत एफसीआय येथे ‘न्यूट्रीशन फिएस्टा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन पोदार प्रेप-२, बेसा, नागपूरच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले.यावेळी सेंटर हेड मोना सिंग यांनी पोदार प्रेपमध्ये राबविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाची माहिती दिली. लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये पौष्टिक आहार, आरोग्यदायी सवयी आणि संतुलित आहाराचे महत्त्व रुजविण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम सादर करण्यात आले. या उपक्रमांमध्ये पौष्टिक आहाराचे महत्त्व, आरोग्यदायी जीवनशैली याबद्दल माहिती देणाऱ्या कार्यशाळा आणि संवादात्मक सत्रांचा समावेश होता.

पालक आणि विद्यार्थ्यांचे प्रतिसाद

कार्यक्रमाला पालक, विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी पोषणाबाबत जनजागृती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उपस्थितांचे आभार मानले गेले.