नागपूर: 

आचार्य धम्मानंद कोसंबी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पाली-प्राकृत व बौद्ध अध्ययन विभाग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ऑक्टोबर रोजी संशोधन पद्धतीशास्त्रावर कार्यशाळा आयोजित करण्यात आलीपाली-प्राकृत विभागाच्या सेमिनार हॉलमध्ये झालेल्या या कार्यशाळेत डॉ. भीमराव गोटे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी डॉ. निरज बोधी होते.

कार्यशाळेत संशोधन विषयाची निवड, संदर्भ साहित्याचा अभ्यास, माहिती संकलन, संशोधनाची शास्त्रीय मांडणी आणि संशोधन प्रक्रियेतील विविध टप्प्यांची माहिती या वेळी देण्यात आली. कार्यशाळेला प्रा. रमेश शंभरकर, प्रा. मंगेश जुनघरे, प्रा. प्रीती वानखेडे, प्रा. सरोज डांगे, प्रा. गौतम कांबळे, प्रा. मोहन वानखेडे, शिल्पा मेश्राम यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना संशोधनाची शास्त्रीय दृष्टी विकसित करण्यासाठी मार्गदर्शन मिळाले.