ईश्वरी पांडेची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड
नागपूर ,
दृष्टीहीन जलतरणपटू कुमारी ईश्वरी पांडे हिची निवड 25 व्या नॅशनल पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप 2025 साठी झाली आहे. या स्पर्धेचे आयोजन कंडक्ट प्यारा ओलंपिक कमिटी ऑफ इंडिया द्वारे सर बीएमसी बालयोगी एक्वेटिक कॉम्प्लेक्स, गोचीबावली, हैदराबाद येथे 15 ते 18 नोव्हेंबर 2025 दरम्यान करण्यात येणार आहे.
ईश्वरी पांडे ही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. ती 100 मीटर, 50 मीटर, आणि 50 मीटर बेस्ट या इव्हेंटमध्ये सहभाग घेणार आहे. ईश्वरीने आपल्या जलतरण कारकिर्दीत 50 मीटर आणि 100 मीटर फ्रीस्टाइल इव्हेंटमध्ये दोन गोल्ड आणि एक रजत पदक मिळविलेले आहे.
ईश्वरी पांडेच्या यशाबद्दल तिचे प्रशिक्षक संजय बाटवे यांनी सांगितले की, “ईश्वरी एक अत्यंत मेहनती आणि प्रेरणादायक जलतरणपटू आहे. तिचा आत्मविश्वास आणि मेहनत यामुळे ती राष्ट्रीय स्तरावर यश मिळवू शकते.”
ईश्वरी ही नागपूर येथील शार्क्वेटिक स्पोर्टिंग असोसिएशन क्लबची सदस्य आहे, तिच्या पालकांनी आणि जलतरण प्रेमींनी ईश्वरीला उज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या आहे.



