नागपूर | २ जानेवारी २०२६ - दत्त मेघे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, नागपूर येथील ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित 'पुस्तक दान' उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेत कॉलेजच्या संहिता सिद्धांत विभागाचे प्रमुख डॉ. अमोलशहा मडावी यांनी त्यांचे स्नेही डॉ. मुजाहिद खान यांच्या सहकार्याने ४० महत्त्वपूर्ण पुस्तके ग्रंथालयाला भेट दिली आहेत.

डॉ. मडावी आणि डॉ. खान यांनी दिलेले हे योगदान विद्यार्थ्यांच्या ज्ञानासाठी अत्यंत मोलाचे ठरणार आहे. या उपक्रमातून प्रेरणा घेऊन इतर प्राध्यापक आणि माजी विद्यार्थ्यांनीही अशाच प्रकारे ग्रंथालयाला समृद्ध करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन ग्रंथालय विभागाकडून करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात प्रोफेसर डॉ. स्नेहल कुकडे, विश्वकुंभ आयुर्वेद चे संचालक डॉ. संतोष पुसदकर, श्री अजय कुथे, श्री संकेत उपस्थित होते.

उपक्रमाचे उद्दिष्ट

या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट गरजूंना ग्रंथालयातून त्यांच्या अभ्यासासाठी मोफत पुस्तके वाचता यावी हा आहे.