सावित्रीबाई फुले जयंतीचा कार्यक्रम नागपूरमध्ये

नागपूर, 3 जानेवारी 2026: सावित्रीबाई फुले नागरी सहकारी पत संस्था हनुमान नगरने शनिवारी सायंकाळी 7.00 वाजता सावित्रीबाई फुले जयंतीचा कार्यक्रम गृहिणी समाज सभागृहात मोठ्या संख्येने आणि उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमात संस्थेचे सदस्य, संचालक मंडळ, महिला बचत गट आणि हनुमान नगर येथील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त पंडीत बच्छराज विद्यालयाच्या मुख्याध्यापिका  अर्चना अनील जोशी उपस्थित होत्या. मंचावर संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप पहाडे आणि उपाध्यक्षा शारदा क्षत्रिय उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सावित्रीबाईंच्या फोटोला माल्यार्पण करून करण्यात आली. यानंतर वृषाली  कोडापेने माय भवानीचे सुंदर गीत सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. प्रमुख अतिथींचा परिचय आणि स्वागत समारोह यानंतर पार पडला.

सौ मंजूषा बनसोड यांनी सावित्रीबाईवर स्वरचित सुंदर गीत सादर केले. तसेच अंजली जोशी आणि मेधा भांडारकर यांनी सुंदर एकपात्री नाटक सादर केले.  दीप्ती तपासेने प्रासंगिक देवीचा गोंधळ सादर केला. याशिवाय  मंजूषा बनसोड आणि चमूनी एक पथनाट्य सादर केले.

कार्यक्रमाच्या समारोपात  अर्चना जोशींनी सावित्रीबाईंच्या कार्यशैलीवर प्रकाश टाकला आणि संस्थेच्या उद्दिष्टांची महत्त्वाची माहिती दिली.