6 मार्च 2026 रोजी तरुण भारत कार्यालय, रामदासपेठ येथे संपर्क मित्र कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत 25 व्यक्तींनी सहभाग घेतला. कार्यशाळेतील प्रमुख वक्ते गौरी सरनाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता संपर्क मित्र अँप कसे वापरायचे याबद्दल माहिती देणे. उपस्थितांनी या अँपच्या उपयोगाबद्दल विचारलेल्या प्रश्नांना गौरी सरनाईक यांनी उत्तरे दिली.

तरुण भारत तर्फे आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा संवाद साधण्याच्या नव्या तंत्रज्ञानाच्या वापरावर लक्ष केंद्रित करत होती. यामुळे उपस्थितांना संपर्क साधण्याची एक नवीन दिशा मिळाली.