रात्रीच्या अपघातांचे वाढते प्रमाण

नागपूर - रात्रीच्या काळात वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सफेद LED हेडलाईटमुळे समोरून येणाऱ्या वाहनचालकांच्या डोळ्यांवर तीव्र प्रकाश पडून दृष्टी बाधित होते. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत, डॉ. प्रवीण डबली यांनी परिवहन विभाग, नगर विकास मंत्रालय व राज्य शासनाकडे पूर्वीप्रमाणे पिवळ्या हेडलाईटचा आणि काळ्या पट्टीचा वापर अनिवार्य करण्याची मागणी केली आहे.

पिवळ्या हेडलाईटचा वापर

डॉ. डबली यांनी सांगितले की, पूर्वी वाहनांमध्ये पिवळ्या रंगाचे हेडलाईट व काळी पट्टी लावली जात होती. या प्रणालीमुळे प्रकाशाचा झगमगाट कमी होऊन वाहनचालकांना स्पष्टपणे रस्ता दिसत असे. मात्र, आता वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पांढऱ्या LED लाइटमुळे ग्लेअर (glare) वाढला आहे, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.

अपघातांचे कारण

गाडी चालवताना डोळ्यावर लाईट येतो आणि त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढलेले आहेत हे रोज घडत आहे. सध्या कोणतीही उपाययोजना नाही कारण आधी लाईट पिवळे राहायचे आणि त्या हेडलाईटवर काळी पट्टी असायची. पण आता परिस्थिती बदलली आहे आणि पिवळे या ठिकाणी एलईडी लाईटचा वापर व्हायला लागला आहे.

शहरातील रस्त्यांची स्थिती

मोठ्या गाड्यांचे लाईट सरळ टू व्हीलर चालवण्याच्या डोळ्यावरील त्रासाचे कारण आहे. मोठ्या रस्त्यांमधला डिव्हायडरची स्पेस कमी असल्यामुळे याचा अनुभव समृद्धी महामार्गावर घेतला आहे, जिथे रस्त्यामधली डिव्हायडरची स्पेस मोठी असल्यामुळे दुसऱ्या कडच्या लाईटने लेफ्ट साईडच्या वाहनांच्या चालकांच्या डोळ्यावर येत नाही.

जनतेची मागणी

आता लोकांची मागणी आहे की परत हे एलईडी लाईटचा वापर बंद करून पिवळे लाईट वापरावे आणि त्यावर हेडलाईटवर वरच्या भागाला काळी पट्टी लावावी. जेणेकरून अप्पर लाईट मारत असताना तो चालकाच्या डोळ्यावर येणार नाही.