दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा न्यायालय बार रूम नं.622 मध्ये अधिवक्ता परिषदेच्या जेष्ठ अधिवक्त्यांचा दीपावली मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विदर्भ प्रांताचे अध्यक्ष मा. दत्ताजी डुबे, ज्येष्ठ अधिवक्ता सुनील पाळधीकर, अरुण पाटील सर, बक्षी सर, अंजली जोशी मॅडम, पद्मा चांदेकर मॅडम आणि अधिवक्ता परिषदेचे अन्य सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
या दीपावली मिलनात ज्येष्ठ अधिवक्त्यांनी त्यांच्या अनुभवांची माहिती दिली. त्यांनी अधिवक्ता परिषद कशी स्थापन झाली यावर अनुभव कथन केले. या कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी त्यांचे विचार आणि अनुभव ऐकले. ज्येष्ठ अधिवक्त्यांनी अधिवक्ता परिषद कशी वाढवावी यावर मार्गदर्शन केले.
अधिवक्ता परिषद नागपूर महानगरच्या स्थापत्य सदस्यांनी या कार्यक्रमात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. ज्येष्ठ अधिवक्त्यांचे अनुभव कथन आणि त्यांच्यासोबत मुक्त संवाद हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. व अल्पोपहार व चहा नी कार्यक्रमाची सांगता झाली


