**डॉ. संतोष सुर्यकांत पुसदकर यांच्या दिव्य नाडी परीक्षणाचा विद्यार्थी अनुभव**
दत्ता मेघे आयुर्वेद मेडिकल कॉलेज येथे *दिव्य नाडी परीक्षण* या अनोख्या प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सुप्रसिद्ध आयुर्वेदतज्ञ **डॉ. संतोष सुर्यकांत पुसदकर** यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सत्रामध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी अद्वितीय आणि आश्चर्यचकित करणारा अनुभव घेतला.आयुर्वेदात दूत नाडी, नाथ नाडी व पञ्चभौतिक नाडी यांचे सविस्तर वर्णन मिळते. नाडीचा स्पर्श घेऊन शरीरातील दोष, रोगप्रकृती, मानसिक प्रवृत्ती तसेच जीवनातील काही सूक्ष्म बाबींचा अंदाज साधता येतो, या प्राचीन ज्ञानशाखेचे सजीव सादरीकरण डॉ. पुसदकर यांनी विद्यार्थ्यांसमोर करून दाखवले. विशेष म्हणजे नाडी परीक्षणाद्वारे व्यक्तीने काल कोणते अन्न घेतले, कोणता रंग आवडतो, कोणते वाहन खरेदी केले आहे किंवा त्यास कोणता आजार झाला आहे याची माहिती वर्तवता येते—हा प्रत्यक्ष अनुभव अनेक विद्यार्थ्यांसाठी विस्मयकारक ठरला.
कार्यक्रमात एकूण १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यापैकी ५५ विद्यार्थ्यांनी डॉ. पुसदकर यांच्या दिव्य नाडी परीक्षणाचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याची नोंद झाली. विद्यार्थ्यांनी याला अद्भुत, प्रेरणादायी व आयुर्वेदीय निदानशास्त्र समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे मत नोंदवले. भविष्यात रुग्ण चिकित्सा व औषधनिर्माण पद्धतीत या ज्ञानाचा प्रभावी वापर कसा होऊ शकतो यावरही डॉ. पुसदकर यांनी मार्गदर्शन केले.आयुर्वेदातील प्राचीन निदान तंत्राचा आधुनिक विद्यार्थ्यांनी केलेला हा अनुभव नक्कीच संशोधन व नैदानिक प्रयोगशीलतेसाठी नवे मार्ग खुली करणारा ठरला आहे.



