*अरिहंत हॉस्पिटल मध्ये निशुल्क बाल शल्यक्रिया शिबिर*
अरिहंत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वैद्यनाथ चौक, नागपूर येथे निखिल कुमार कुसुमगर यांच्या नेतृत्वात बाल शल्यक्रिया शिबिराचे आयोजन कुसुमगर परिवाराच्या वतीने करण्यात आले होते, ज्यामुळे अनेक गरजू मुलांना शल्यक्रिया करण्याची संधी मिळाली. शिबिरात शंभरच्या वर मुलांची शस्त्रक्रिया करण्यात आले, ज्यामध्ये मुख्यतः स्पाईन आणि लघवी व संडास च्या समस्या असलेल्या मुलांचा समावेश होता. शिबिरात सहभागी झालेल्या मुलांमध्ये अनेक जण अत्यंत गरीब कुटुंबातील होते, तसेच नागपूर जिल्ह्यातील आणि इतर जिल्ह्यातील आजूबाजूच्या खेडेगावातील 17 वर्षांपर्यंतच्या मुलांची शस्त्रक्रिया करण्यात आली.
श्री जैन सेवा मंडळाचे सचिव डॉ दीपक शेंडेकर यांनी या शिबिराबद्दल प्रशंसा व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, "शिबिर उत्कृष्ट होते आणि येथे शस्त्रक्रिया झालेल्या मुलांच्या सर्व आवश्यक उपचारांची व्यवस्था करण्यात आली होती."
या शिबिराला दीपक शेंडेकर, सुरेश डायमंड, मिलिंद वाचनेकर, विनोद विंचूरकर आणि इतर सहकाऱ्यांनी भेट दिली असता हॉस्पिटल चे पर्सनल डायरेक्टर आनंद मालोकर यांनी शिबिर विषयी माहिती देताना सांगितले की या शस्त्रक्रिया करण्यासाठी अमेरिका, युरोप येथील शल्यचिकित्सक आणि स्थानिक निवासी डॉक्टर, वैद्यकीय तज्ञ त्यांचे सहयोगी परिचारिका यांच्या सहकार्याने हे शिबिर संपन्न झाले. शिबिराला जैन धर्म गुरु प्रेम तीर्थ महाराज यांचे आशीर्वाद लाभले. अनेक गणमान्य व्यक्ती व संस्थांनी या शिबिराला आपली उपस्थिती दर्शविली. या शिबिराचे आयोजानासाठी सर्वांनी कौतुक केले.
शिबिराच्या यशस्वीतेमुळे कुसुमगर परिवाराचे कार्य खरोखरच प्रशंसा करण्यास पात्र आहे. या उपक्रमामुळे अनेक मुलांचे जीवन बदलले आहे आणि त्यांच्या कुटुंबांना एक नवीन आशा मिळाली आहे.


