गाडगेबाबा नगर येथे रांगोळी स्पर्धा

नागपूर, 

२ ६ ऑक्टोबरला श्री संत गजानन महाराज सद्गुरु सेवा मंडळ ट्रस्ट तर्फे गाडगेबाबा नगर, प्रभाग क्रमांक 28 रमणा मारोती परिसरात भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत परिसरातील माता भगिनी व लहान मुला मुलींनी  मोठ्या संख्येने सहभागी होऊन रांगोळी काढली.

स्पर्धेचा परीक्षक म्हणून हर्षल कावरे यांनी काम पाहिले.  विजेत्यांची निवड केली. या स्पर्धेत जवळपास ७ ० स्पर्धकांनी सहभाग घेतला, ज्यामुळे स्पर्धेची गुणवत्ता वाढली.

बक्षीस वितरण समारंभात पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, प्रमोद पेंडके, माजी स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, वाठोडा मंडळ अध्यक्ष राजू गोतमारे, हनुमान मंडळ अध्यक्ष किरण दातीर, बाळा विटाळकर, हर्षल मलमकर, भावेशी शेरजे, दीपक कारेमोरे, प्रवीण ऊरकुडे, अनुराग राघोते यांची उपस्थिती होती. या सर्व मान्यवरांनी विजेत्यांना बक्षिसे प्रदान केली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रितम देशमुख, योगेश सहारे, शुभम मुंडले, सागर शिरपुरकर, हेमा कडु, निलिमा साखरे यांनी  अथक प्रयत्न केले. त्यांच्या मेहनतीमुळे या स्पर्धेचे आयोजन यशस्वी झाले.