मधुकर भवन रेशीम बाग येथे ग्रंथालय भरती चा दिवाळी अंक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात विदर्भ प्रांत कार्यवाह अतुल जी मोघे आणि प्रमुख वक्ता आशुतोष जी उपस्थित राहणार आहेत.

या अंकामध्ये सर्व कलाक्षेत्र, ग्रंथालय क्षेत्र आणि इतर अनेक विषयांवर छान लेख प्रकाशित केले जातील. या उपक्रमाचा मुख्य उद्देश वाचनाची आवड निर्माण करणे आणि वाचन संस्कृतीला वाव देणे आहे.

या अंकाच्या प्रकाशनामुळे वाचनाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढेल आणि समाजात वाचनाची आवड निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे.