नागपूर,

आधुनिक काळात देखील आयुर्वेदिक उपचाराकडे लोकांचा कल वाढत असून तरुणांनी आयुर्वेदिक उपचार पद्धती अभ्यास करावा असे प्रतिपादन आयुर्वेदतज्ञ डॉ. संतोष पुसदकर यांनी केले. वानाडोंगरी येथील दत्ता मेघे आयुर्वेदिक कॉलेज मध्ये प्रथम वर्ष बीएएमएस विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या ट्रान्झिशनल करिक्युलम कार्यक्रमात डॉ. पुसदकर यांनी “आयुर्वेदाचा व्याप, संधी आणि आधुनिक युगातील गरज” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

डॉ. पुसदकर यांनी विद्यार्थ्यांना आयुर्वेदातील विविध करिअर मार्गांची माहिती देताना क्लिनिकल प्रॅक्टिस, पंचकर्म तज्ज्ञता, संशोधन क्षेत्र, औषधनिर्मिती उद्योग, वेलनेस व लाईफस्टाईल मेडिसिन, हेल्थ टुरिझम तसेच सरकारी सेवांमधील उपलब्ध संधींबद्दल सविस्तर माहिती दिली. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने आयुर्वेद जागतिक पातळीवर वेगाने विस्तारत असून विद्यार्थ्यांसाठी हा सुवर्णकाळ असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घेत प्रश्नोत्तर सत्रात अनेक शंका मांडल्या व तज्ञांनी त्याचे निराकरण केले.