संघ परिवारा तर्फे विविध ठिकाणी विशाल हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या कार्यासाठी कार्यालयाची व्यवस्था करण्यात येत आहे. यामध्ये श्रीनगर आणि सुंदरबन ले आउट या दोन ठिकाणांचा समावेश आहे.

1 फेब्रुवारी 2026 रोजी, श्रीनगर आणि सुंदरबन ले आउट येथील कार्यालयाचे उदघाटन नवनिर्वाचित नगरसेवक प्रभाग क्र.35 च्या सौ.विशाखा प्रकाश मोहोड यांच्या हस्ते थाटात संपन्न झाले. या समारंभात शैलेंद्र श्रीवास्तव यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

 या कार्यालयाच्या माध्यमातून विशाल हिंदू संमेलनाच्या आयोजनासाठी जागा आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

विशाल हिंदू संमेलनाच्या आयोजनामुळे स्थानिक समुदायाला एकत्र येण्याची संधी मिळेल आणि विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. या संमेलनामुळे हिंदू संस्कृतीचा प्रचार व प्रसार होईल, असे आयोजकांनी सांगितले.