कळमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्कलचे आरक्षण जाहीर

कळमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्कलचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले आहे. या आरक्षणामुळे तालुक्यातील सर्व नेते व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. या आरक्षणामुळे निवडणूक लढविणाऱ्या कार्यकर्त्यास मदत होणार आहे 

तेलकामठी सर्कल इतर मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेले आहे. याशिवाय, कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा सर्कल यावेळेस सर्वसाधारण लोकांकरिता करिता आरक्षित झालेले आहे. या ठिकाणी महिला व पुरुष दोघेही निवडणूक लढवू शकतात. 

गोंडखैरी सर्कल हे इतर मागासवर्गीय महिलांकरिता राखीव झालेले आहे. पंचायत समितीमध्ये तेलकामठी गण सर्वसाधारण  लोकांकरिता, कोहळी गण सर्वसाधारण  लोकांकरिता गोंडखैरी गण ओबीसी महिला करिता, सेलू गण अनुसूचित जाती महिला करिता, धापेवाडा गण अनुसूचित जमाती महिला करिता तर उबाळी गण सर्वसाधारण करिता आरक्षित करण्यात आलेले आहे.

ही आरक्षण प्रक्रिया दर पाच वर्षांनी बदलत असते, ज्यामुळे महिलांना अधिक संधी मिळू शकते. यामुळे कळमेश्वर तालुक्यातील लोकशाही प्रक्रियेत नवे चेहरे समोर येण्याची शक्यता आहे.