किंग्स कींडम शाळेचे स्नेह-संमेलन
नागपूर,
किंग्स कींडम शाळेचे स्नेह-संमेलन दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्कार भारतीच्या अध्यक्षा कांचनगडकरी आणि प्रभाग 35 च्या नवनिर्वाचित नगरसेविका विशाखामोहोड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
या स्नेह-संमेलनात जवळपास 100 बाल कलाकारांनी भाग घेतला. कांचन गडकरी यांनी आपल्या भाषणात सर्व बाल कलाकारांना संबोधित करताना त्यांच्या पालकांना एक महत्त्वाचा संदेश दिला. त्यांनी सांगितले की, "प्रत्येक माता जिजाऊ बनावी, जेणेकरून शिवाजी घराघरात तयार होईल." त्यांनी मुलांवर योग्य संस्कार करण्याचे महत्त्व आणि भारतीय ज्ञान परंपरेवर चर्चा केली.
विशाखा मोहोड यांनी शिक्षणाबाबत आवश्यक परिवर्तनाचे आश्वासन दिले. त्यांनी स्पष्ट केले की, शिक्षण नेहमीच प्राधान्य असावे आणि पालकांनी त्यांच्या मुलांच्या शिक्षणात सर्वतोपरी मदत करावी.
या स्नेह-संमेलनाचे श्रेय संस्थेच्या संस्थापक मेघा डोंगरे आणि सह-समन्वयक अनुपमा उगलमूगले यांना दिले गेले.मेघा डोंगरे यांनी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले, ज्यांनी स्नेह-संमेलनाची शोभा वाढवली.
या कार्यक्रमामुळे सर्व बाल गोपाल आणि पालकांनी आयोजकांचे कौतुक केले आणि संस्थापकाचे आभार मानले. स्नेह-संमेलनाच्या यशाबद्दल पालकांनी अभिप्राय देताना सांगितले की, "मुलांना प्रोत्साहन मिळाले आणि योग्य संस्कार वाढले."


