महाराष्ट्र वीज निवृत्त जेष्ठ नागरिक संघाने आज नांदेड येथे एक महत्त्वाची बैठक आयोजित केली. या बैठकीत ३४ सभासद उपस्थित होते, ज्यामध्ये संघटनेच्या कामकाजावर चर्चा करण्यात आली.

बैठकीत प्रमुख मुद्दे म्हणून संघटनेने आजपर्यंत कामगारांना मिळवून दिलेल्या फायद्यांवर मार्गदर्शन केले. यामध्ये सेवा पुस्तीकेची फोटो प्रत मिळवणे, सेवानिवृत्ती नंतर कंफनीचे ओळखपत्र मिळविणे, आणि कंपनीच्या गेस्ट हाऊस मध्ये राहण्याची सोय उपलब्ध करणे यांचा समावेश होता.

बैठकीत शंकर पहाडे, महामंत्री, आणि अध्यक्ष स्थानी दताजी शिंदे उपस्थित होते. या बैठकीत घेतलेल्या निर्णयांमध्ये कामगारांना पेन्शन योजना लागू करणे, रेल्वे तिकीटावर बंद करण्यात आलेली सवलत जेष्ठांकरीता पुन्हा सुरू करणे, आणि सभासद संख्या वाढवून संघटना मजबूत करणे यांचा समावेश आहे.