नागपूर,
सावरकर नगर येथील उद्यान अनेक वर्षांपासून बंद होते. स्थानिक नगर सेवक आणि नगरवासीयांच्या अथक प्रयत्नांनी आता हे उद्यान पुनः खुलले आहे. या उद्यानात चिमण्यांची चिव चिव आणि लहान मुलांची मस्ती ऐकायला मिळते, ज्यामुळे उद्यानाला एक नवा उत्साह प्राप्त झाला आहे.
उद्यानाच्या पुनरुज्जीवनामुळे स्थानिक लोकांना एकत्र येण्याची आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याची संधी मिळाली आहे.या उद्यानाच्या पुनरुज्जीवना मागे स्थानिक समुदायाची एकजूट आणि नगर सेवकांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांच्यामुळेच या उद्यानात सर्व साहित्य आणि सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. नगरवासीयांनी आपल्या अडचणी समजून घेतल्यामुळे हे उद्यान आता सर्वांसाठी खुला झाला आहे.



