शनिवार दि. २८ फेब्रुवारी रोजी शंकरनगर वस्तीचा सकल हिंदू संमेलनाचा कार्यक्रम उत्साहात आणि आनंदात साजरा केला गेला. 

गत साधारण १५ दिवसांपासून या कार्यक्रमाच्या वातावरण निर्मितीच्या दृष्टीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यात दि. ११ फेब्रुवारी रोजी २५ वर्षांवरील महिला व पुरुषांचे‌ "मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा" घेण्यात आली. १५ फेब्रुवारी ला १५ वर्षांपर्यंत मुलामुलींची "भारतीय परिधान वेशभूषा स्पर्धा" घेण्यात आली. १९ ते २१ फेब्रुवारी दरम्यान" हिंदू गृह सजावट" स्पर्धा आणि २२ ला आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. २७ तारखेला सायंकाळी संपूर्ण शंकरनगरातून दुचाकी वाहन फेरी झाली.

शंकर नगरच्या सर्व क्षेत्रांमधून या सर्व कार्यक्रमांना अतिशय उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला आणि परिणामी २८ फेब्रुवारी या दिवशी मुख्य उत्सव अत्यंत उत्तम रितीने संपन्न झाला.

या दिवशी संमेलनात सुरवातीला 

रामकृष्ण मठाचे स्वामी श्रद्धेय ज्ञानगम्यानंद यांचे समर्पक आशिर्वचन प्राप्त झाले. तद्नंतर विश्व हिंदू परिषदेचे मा. प्रा. अजयजी निल्दावार यांच्या ओजस्वी मार्गदर्शनाने वातावरण हिंदुत्वमय झाले. 

यानंतर वस्तीतील सर्व वयोगटातील बालक-बालिका आणि महिला-पुरुषांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे अतिशय परिणामकारक सादरीकरण अत्यंत परिश्रमपुर्वक केले. महाप्रसादानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला. 

अशा प्रकारे वस्तीतील जवळपास प्रत्येक घरातून काही ना काही सहभाग लाभलेला हा कार्यक्रम संख्यात्मक दृष्ट्या आणि गुणात्मक दृष्ट्या अप्रतीम झाला.

🙏