श्री गुरु दत्त जयंती उत्सव साजरा 

नागपूर, 

श्री गुरु दत्त जयंती उत्सव 27 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर  या कालावधीत श्री गणेश दत्त गुरु मंदिर, लाखनी, जिल्हा भंडारा येथे आयोजित करण्यात आला. हा उत्सव भक्तांसाठी एक विशेष धार्मिक अनुभव होता .


उत्सवाच्या दरम्यान, 27 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते 9.30 दरम्यान कीर्तन आयोजित, ज्यामध्ये संगीता गलांडे नागपूर यांचा सहभाग. 1 डिसेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान, पुनः कीर्तन  अनुपमा देशकर, धामणगाव यांच्या मार्गदर्शनाखाली. 1 डिसेंबर रोजी श्रीमद् भागवत गीता पठण व चिंतन दुपारी 2 ते 4 व हरिपाठ दुपारी 4 ते 5 आयोजित करण्यात आले. 4 डिसेंबर रोजी सकाळी 6.30 ते 8.30 यामध्ये पालखी नगर प्रदक्षिणा, 7.30 ते 10 श्री पवमान सुक्ताभिषेक आणि 11 ते 12 श्री दत्तजन्म सोहळा आयोजित केला. 5 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 12  गोपाळकाला व दुपारी 1.30 ते 5.30 महाप्रसाद याची व्यवस्था करण्यात आली आहे.या उत्सवातअरुण कडबे व समस्त गुरुमंदिर भक्त गण सहभागी झालेत. उत्सवाच्या तयारीसाठी भजन कीर्तन, जन्मोत्सव, महाप्रसाद याची संपूर्ण व्यवस्था उत्तम प्रकारे समिती तर्फे केली आहे.हा उत्सव 2007 पासून दरवर्षी आयोजित केला जात आहे आणि यंदा 19 वा जयंती सप्ताह आहे.