श्री प्रभाकर डोंगरे यांचा जन्म १९२७ मध्ये मध्यप्रदेशच्या बैतुल येथे झाला. त्यांचे शिक्षण १०वीपर्यंत बैतुलमध्ये झाले. १९४५ मध्ये त्यांनी नागपूरला बंगाल नागपूर रेल्वे (बिएनआर) मध्ये काम करण्यास सुरुवात केली. १९४९ मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सत्‍याग्रहात सहभागी झाले आणि तीन महिन्यांसाठी कारावासात गेले.

शिक्षक म्हणून डी.डी. नगर विद्यालयात रुजू झाल्यानंतर, १९५५ मध्ये ते एनसीसी (एयर विंग) मध्ये सामील झाले. १९७७ मध्ये ते महाराष्ट्र एयर स्काड्न. एनसीसी म्हणून निवृत्त झाले. वयाच्या ५०व्या वर्षी त्यांनी बीए बीएड केले आणि १९८७ मध्ये शाळेतून निवृत्त झाले.

श्री डोंगरे यांना तीन गुणी मुले आहेत - प्रशांत, प्रमोद, विनोद. त्यांच्या जीवनात आदर्शता, तृप्तता आणि सहकार्याचे महत्व आहे. आजही ते रोज सकाळी फिरायला जातात आणि घराच्या आजूबाजूला वृक्षारोपण करणे व संगोपन करणे यामध्ये सक्रिय आहेत.

त्यांचे जीवन हे आई-वडिलांचे संस्कार आणि समाज प्रबोधनाचे कार्य यांचे उत्तम उदाहरण आहे. तरूण पिढीला उत्साहीत व कार्यान्वित करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. या अद्वितीय व्यक्तिमत्त्वाला ईश्वरचरणी प्रार्थना आहे की, त्यांना उदंड आयुष्य लाभो.