राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेला पालकमंत्री बावनकुले यांची भेट
कोराडी (नागपूर) येथे तालुका क्रीडा संकुलात सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक क्रीडा स्पर्धेला महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले यांनी भेट देऊन खेळाडूंचे मनोबल उंचावले. त्यांनी विविध गटातील विजेत्या खेळाडूंना पुरस्कार प्रदान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या भेटीदरम्यान स्पर्धेतील व्यवस्थापन, सुविधा आणि खेळाडूंच्या तयारीची त्यांनी माहिती करून घेतली. शालेय पातळीवरूनच जिम्नॅस्टिकसारख्या कठीण आणि कौशल्यपूर्ण खेळाला मिळणारा उत्साह पाहून समाधान व्यक्त केले.
उपस्थित मान्यवर
कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, मनपा क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष अंबुलकर, क्रीडा मार्गदर्शक निशांत पाटील, जिम्नॅस्टिक संघटनेचे सचिव पुरोषोत्तम दरवानकर, क्रीडा अधिकारी अनिल बोरवार, कोराडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच नरेंद्र धनोले यांसह अर्चना दिवाने, नेहरू युवा केंद्र मित्र अंशुल जिचकार, अनुराधा अमीन, कमल धात्रक, लुकेश वरोकर, रितेश मैंद, उमेश निमोने, अविनाश भोयर, अरविंद खोपे, संदीप दिवाने, दिवाकर तितरमारे, कुणाल भोस्कर, निलोफर शेख तसेच इतर मान्यवर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने खेळाडू उपस्थित होते.
स्पर्धेचा उद्देश आणि महत्त्व
स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यातील जिम्नॅस्टिक क्रीडा संस्कृतीला अधिक चालना मिळणार असल्याचे मतही उपस्थितांनी व्यक्त केले. या स्पर्धेत शंभरच्या वर खेळाडू सहभागी झाले असून, प्रत्येक सहभागाला प्रमाणपत्र देण्यात येईल. सध्या सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रत्येक स्पर्धकाला ट्रॉफी, प्रमाणपत्र व मेडल भेट देण्यात आले आहे.



