साई सावली वृद्धाश्रमातर्फे 'गंध आपुलकीचा' कार्यक्रम संपन्न
नागपूर,
गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील पुसेर येथे *सत्यसाई बहुद्देशीय संस्थे* द्वारे संचालित *साई सावली वृद्धाश्रम* यांनी 'गंध आपुलकीचा' हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आदिवासी माडिया गोंड जमातीतील लोकांना आधार देणे आणि त्यांच्यात ऋणानुबंध प्रस्थापित करणे हे होते.या वर्षी, संस्थेने ४०० लोकवस्ती असलेल्या आदिवासी दुर्गम वस्तीतील प्रत्येक कुटुंबाला एक साडी, शर्ट-पॅन्ट, ब्लॅंकेट आणि फराळाचे पॅकेट वितरित केले. दानशूर लोकांनी रोख व वस्तू स्वरूपात योगदान देऊन या उपक्रमात सहभाग घेतला. या उपक्रमामुळे स्थानिक आदिवासी समुदायाच्या जीवनमानात सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे.
कार्यक्रमाचे आयोजन डॉ. विनोद केळझरकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यामध्ये नगरसेविका विशाखा मोहोड, रवींद्र गीते, उदय लाड, जगदीश कावळे, नरेश बैस, प्रकाश मोहोड, अभिजित काठाले,अभिजित मस्के आणि तीर्थराज बोबडे यांचा समावेश होता. या सर्व पदाधिकार्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.या उपक्रमामुळे आदिवासी समुदायाच्या जीवनात आनंद आणि एकता निर्माण झाली आहे. 'गंध आपुलकीचा' कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येतो, ज्यामुळे समाजातील दानशूर लोकांचे योगदान आणि एकता यांचे महत्त्व अधोरेखित होते.


