मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे.असं म्हटलं जातं. समाजात मिसळणं, एकत्र राहणं आणि इतरांशी संवाद साधणं त्याला आवडतं. सामाजिक संबंधातून तो आपलं उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न करतो. एकत्र जेवण्याची पद्धतही यातूनच जन्माला आली असावी. माणसांना एकत्र बसून जेवायला का आवडतं? मित्र, कुटुंब किंवा सहकारी, एकत्र जेवणं फक्त खाण्यापुरतं मर्यादित नाही, तर ते नाती घट्ट करण्याचं, आनंद वाढवण्याचं आणि सामाजिक संबंध मजबूत करण्याचं महत्त्वाचं साधनही आहे.

हजारो वर्षांपासून माणसं आणि त्यांचे पूर्वज एकत्र जेवण करत आले आहेत. आता अभ्यास सांगतो की, या सवयीमुळे केवळ आनंदच नाही, तर विश्वास, जवळीक आणि सामाजिक सहकार्यही वाढतं हजारो वर्षांपासून माणूस एकत्र बसून जेवणाचा आनंद घेत आला आहे. पण एकत्र बसून जेवणं इतकं महत्त्वाचं का आहे आणि आजही ही परंपरा आपण का चालू ठेवली आहे? जाणून घेऊयात.