नागपूर,
सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविणाऱ्या त्रिमूर्ती नगर गार्डन ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला.दीपक नरसापुरकर यांच्या शेतात निसर्गरम्य वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी वाचासुंदर आणि दीपक नरसापुरकर यांच्या हस्ते आम्रवृक्षाचे रोप लावण्यात आले. दोघांचाही शाल व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
या निमित्ताने वाचासुंदर व नरसापुरकर यांनी मंडळाला एकूण १० हजार रुपयांची देणगी दिली. कार्यक्रमानंतर सर्व सदस्यांसाठी शेतात चुलीवर बनविलेल्या भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली.या कार्यक्रमाला मंडळाचे सुमारे २५ सदस्य उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष श्री अपराजित, सचिव सुधीर वाराणशीवार, कार्याध्यक्ष अनिल पुसदकर तसेच श्री दारोडकर, बोरीकर, भगत, चौधरी व सोनी यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. परिसरातील नगरसेवक ईश्वर ढेंगळे यांनी उपक्रमाचे कौतुक केले.



