10 ऑक्टोंबर 2023 रोजी धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये झालेल्या क्रिकेट स्पर्धेत उमियाशंकर शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. 14 वर्षाखालील गटामध्ये त्यांनी कॉर्टर फायनल जिंकून आपले स्थान मजबूत केले आहे.
या स्पर्धेमध्ये सेंटर पॉइंट हायस्कूल, सेंट जॉन हायस्कूल यांसारख्या विविध शाळा सहभागी झाल्या होत्या. उमियाशंकर शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर या स्पर्धेत यश मिळवले.
या यशामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, असे शाळेच्या व्यवस्थापनाने सांगितले. विद्यार्थ्यांच्या या यशाने शाळेचा मान वाढला आहे आणि त्यांनी त्यांच्या क्रीडा कौशल्यांमध्ये एक नवा मानक स्थापित केला आहे.



