नागपूर:
महिला कला निकेतन आणि अमृत पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अंकुर दीपावली बाजाराला’ नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिला उद्योजिकांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.बाजाराचे उद्घाटन नगरसेवक गणेश चर्लेवार यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजिका जयश्री पांडे, सुनीता मुंजे, ॲड. सुफला ताटके, आरती आठवले, चारुता घाडगे तसेच अमृत पेठचे धनंजय कुलकर्णी व आदित्य कुलकर्णी उपस्थित होते.
बाजारातील वस्तू
बाजारात आकाशकंदील, पणत्या, सजावटीच्या वस्तू, ज्वेलरी, साड्या, बॅग्स आणि दिवाळी फराळाचे विविध स्टॉल्स लावण्यात आले होते. ग्राहकांनी मोठ्या उत्साहात खरेदी केली. या प्रतिसादामुळे महिला उद्योजिकांचा उत्साह वाढला.आगामी योजनाआगामी मकरसंक्रांतीनिमित्त पुन्हा ‘अंकुर बाजार’ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.



