नागपूर: 

हावरापेठ येथील गणपती-हनुमान मंदिरात कार्तिक एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उत्सवाची सुरुवात माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या स्तवनाने झाली. मंदिरात सर्व मूर्तींचे मंगलस्नान व पूजन प्रशांत कामठे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमात टाळ-मृदंगाच्या गजरात अभंगगायन व संतांच्या भूपाळ्यांनी भक्तिमय वातावरण निर्माण केले. यामध्ये मृदंगवादक हरिदास खंडार आणि टाळकरी तुळशीराम गायकवाड, रमेश मेहर, कृष्णराव सरोदे, मोरेश्वर बांगडे, बाळकृष्ण हातागडे, ॲड. रमेश गवडी, तुळशा गायकवाड व प्रभा नेताम यांचा समावेश होता.महाआरती व प्रसाद वितरण सुरेखा पकडे यांच्या हस्ते करण्यात आले. मंदिरात दररोज पहाटे होणाऱ्या काकड आरतीमुळे परिसरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळत आहे. या उत्सवाने स्थानिक भक्तांमध्ये एकत्रितपणाची भावना जागृत केली आहे.