नागपूर,
राष्ट्र सेविका समितीच्या वतीने उज्ज्वल नगर येथील श्री हनुमान मंदिरात ३० ऑक्टोबर रोजी शंखनाद प्रशिक्षण व मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले. या वर्गाला महिला व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या प्रशिक्षण वर्गात उपस्थितांना शंखनादाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. यासोबतच शंखनादाचे धार्मिक व वैज्ञानिक महत्त्व सांगण्यात आले. शंखनादामुळे फुफ्फुसांचा व्यायाम होतो, श्वसनक्रियेला चालना मिळते आणि मानसिक एकाग्रता वाढण्यास मदत होते, अशी माहिती उपस्थितांना देण्यात आली.या कार्यक्रमात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे सदस्य व शंखनाद आघाडीचे अध्यक्ष राजेश दामले, माजी अध्यक्षा आरती देशपांडे, चंद्रहास बल्लाळ आणि हर्षल कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी दैनंदिन जीवनात शंखनादाचा सराव करण्याचे आवाहन केले आणि उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.



