नागपूर:
प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापिका डॉ. कीर्ती विजयराव ठाकरे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठडॉ. किरण एम. ताजने यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले.
या संशोधनात शहरी भागातील आग प्रतिबंधक उपाययोजना, अग्निसुरक्षा, पूर्वसूचना प्रणाली आणि आपत्ती व्यवस्थापन यावर भर देण्यात आला आहे. डॉ. ठाकरे यांनी त्यांच्या संशोधनात शहरी वस्त्यांमधील आगीच्या जोखमीचे व्यवस्थापन कसे करावे यावर सखोल विचार केला आहे.या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. ए. ढाले यांनी त्यांचे अभिनंदन केले. उपप्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, कुटुंबीय आणि सहकाऱ्यांनी त्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. डॉ. ठाकरे यांचे हे यश त्यांच्या कठोर परिश्रमाचे फलित आहे आणि त्यांच्या संशोधनामुळे शहरी भागातील आग व्यवस्थापनात नवे दृष्टीकोन येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आले.



