नागपूर -
दहा दिवसांच्या भक्तिमय उत्सवानंतर संती परिसरातील गणरायाला रविवारी भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. संती परिसरासह इतवारी, फुलओळी, भाजी मंडी, बैरागीपुरा, सराफा बाजार, चितारओळी व महाल परिसरातून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
उत्सवाच्या दहा दिवसांत आरती, मंत्रघोष व अथर्वशीर्षाचे सामूहिक पठण करण्यात आले. विसर्जनावेळी भाविकांच्या डोळ्यांत अश्रू आणि ओठांवर हास्य असे भावनिक वातावरण होते. उत्सव यशस्वी करण्यासाठी निलेश अपराजित, हरीश धोंडरकर, राजाभाऊ, हर्षल चवरे, नरेश ढगे, मुकेश व सागर क्षीरसागर, रघु व अतुल खोत, गजानन शेंडे, विजुभाऊ मेंडजोगे, बाळासाहेब पुराणिक, संजय सुंभाटे यांच्यासह बोरकर परिवार, सोहम, राहुल साहूरकर, पीयूष हटवार, बावनकर, वाघ व कीटे यांनी परिश्रम घेतले.



