नागपूर: आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी राघोजी साळवे यांच्या 232 व्या जयंतीनिमित्त आज नागपूरच्या अंबाझरी उद्यानात भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून लहुजी साळवे यांच्या योगदानाबद्दल विचार व्यक्त केले.
आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी राघोजी साळवे यांच्या २३२ व्या जयंतीनिमित्तअंबाझरी उद्यानातील त्यांच्या पुतळ्याला व स्मारकाला पुष्पांजली अर्पण करून हजारो अनुयायांनी अभिवादन केले.लहुजी साळवे कुस्ती, दांडपट्टा, तलवारबाजी आणि नेमबाजीत निपुण होते. त्यांनी पुण्यात अनेक क्रांतिकारकांना प्रशिक्षण दिले, असे प्रतिपादन प्रज्ञा प्रवाहाचे अखिल भारतीय टोली सदस्य प्रा. सदानंद सप्रे यांनी केले.त्यांचें विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी घराघरात त्यांची प्रतिमा असणे आवश्यक असून, त्यांची जयंती दरवर्षी अधिक व्यापक स्वरूपात साजरी झाली पाहिजे, असे मत विवेक विचार मंच, पूर्व विदर्भाचे संयोजक राजू साळवे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायक इंगोले यांनी मार्गदर्शन करताना लहुजींचे शौर्य, देशप्रेम, त्याग आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या मुलींच्या शाळांना त्यांनी दिलेले संरक्षण हे तरुणांसाठी सदैव प्रेरणादायी असल्याचे सांगितले.प्रमुख पाहुणे लहानु इंगळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणारे बी. टी. खडसे, गौरी इंगोले, दुर्गेश बावणे, निखिल वाघमारे, मंगेश कांबळे आणि शिवा तायवाडे यांच्यासह समाजबांधव व भगिनींचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रवींद्र खडसे, सचिन इंगोले व अन्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
नागपूर: महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) मुख्यालयात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
वनबाला गाडी, १९७८ मध्ये स्थापन झालेली, आज नागपूरच्या जंगलात बंदिस्त आहे. या गाडीने अनेक वर्षे शहरातील मुलांना आनंद दिला, परंतु आज तिची अवस्था चिंताजनक आहे.
नागपूरच्या प्राचीन श्री शिव मंदिर परिसरात ५००१ दीपांच्या प्रकाशात भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात आकर्षक रांगोळ्या आणि ३० फुटांचा स्वस्तिक सजविला जाणार आहे.