गुरुपौर्णिमेनिमित्त योगगुरू शंकर पहाडे यांचा सत्कार
नागपूर :
गोपालनगर येथील जनता लेआऊट (दीनदयाल नगर) परिसरातील बगीच्यात गुरुपौर्णिमेनिमित्त ज्येष्ठ योग शिक्षक शंकर पहाडे यांचा शाल व श्रीफळ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
शंकर पहाडे हे दररोज सकाळी परिसरातील महिला व नागरिकांना सुमारे ३५ मिनिटे योगासने व प्राणायामाचे मार्गदर्शन करतात. त्यांच्या योगवर्गात मोठ्या संख्येने नागरिक नियमित सहभागी होत असून आरोग्यदायी जीवनशैलीचा लाभ घेत आहेत.दरवर्षीप्रमाणे यंदाही योगवर्गातील महिला व पुरुषांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांचा गुरु म्हणून गौरव केला. जनार्दन स्वामी मंडळाच्या परंपरेनुसार योगशिक्षण देणारे पहाडे यांच्या निःस्वार्थ सेवेमुळे अनेक नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.



