नागपूर:
राजाबाक्षा येथील नवयुग प्राथमिक शाळेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती वंदनेने झाली.
भारतीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गजानन पिलपीले अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी रवींद्र देशपांडे, कार्यवाह उपेंद्र जोशी, सहकार्यवाह ऋचा हळदे, मुख्याध्यापक अजय काळे यांच्यासह शिक्षक व पालक उपस्थित होते.
यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे हे यश सातत्यपूर्ण मेहनत, पालकांचा पाठिंबा आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे फलित असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव शिंदे यांनी केले. राजेश सिर्तावार यांनी आभार मानले.


