कौंडिण्यपूर दर्शनाने भक्तांना लाभला आध्यात्मिक आनंद

नागपूर,

अधिक महिन्याच्या निमित्ताने अमरावतीजवळील पौराणिक कौंडिण्यपूर येथे भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. नागपूरहून सकाळी साडेसहा वाजता निघालेल्या भाविकांनी वर्धा नदीच्या विस्तीर्ण पात्रात पवित्र स्नान करून विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शन घेतले. अधिक महिन्यामुळे परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती.


दर्शनानंतर भाविकांनी अंबिकामातेच्या मंदिराला भेट दिली. स्थानिक परंपरेनुसार हेच ते ठिकाण मानले जाते, जिथून भगवान श्रीकृष्णांनी रुक्मिणीचे हरण केले होते. मंदिरातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाच्या स्थळांचे दर्शन घेताना भाविकांना विशेष समाधान लाभले.पर्यावरण दिनाच्या निमित्ताने झालेल्या या भेटीत नदीचे स्वच्छ वाहते पाणी, निसर्गरम्य परिसर आणि शांत वातावरण यांचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. या धार्मिक सहलीचे आयोजन एसबीआय समूहाच्या सदस्यांनी केले होते. श्रद्धा, निसर्ग आणि सामूहिक सहभाग यांचा सुंदर संगम अनुभवत भाविकांनी हा दिवस संस्मरणीय ठरविला.