नागपूर, 

५ नोव्हेंबर : नरेंद्रनगर येथील सिद्धिविनायक गणेश मंदिर प्रांगणात सिद्धिविनायक संगीत सभेतर्फे आयोजित ‘सूर-बारस’ दिवाळी पहाट कार्यक्रम उत्साहात पार पडला. स्थानिक कलाकारांच्या सुरेल गायनाने रसिकांची पहाट संगीतमय झाली.

कार्यक्रमाची सुरुवात सुगंधा देशपांडे व चमूच्या गणेश वंदनेने झाली. मनोज जोशी यांनी सूत्रसंचालन केले. विक्रान्त घाटे, सुगंधा देशपांडे, अभय पांडे, अतुल भुसारी, सारिका थत्ते, विराग देशपांडे, सचिन उंटवाले आणि श्रीकांत पातुरकर यांनी विविध हिंदी-मराठी गीते सादर केली

विशेषतः श्रीकांत पातुरकर यांच्या शास्त्रीय अंगाने सजलेल्या गायनाला रसिकांची भरभरून दाद मिळाली. उत्कृष्ट वाद्यसंगत आणि ध्वनी व्यवस्थेमुळे कार्यक्रमाची रंगत वाढली. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ देणारा हा संगीत सोहळा रसिकांसाठी संस्मरणीय ठरला.