गणेशधाम हुडकेश्वर येथे तान्हा पोळा उत्सव ११ सप्टेंबर २०२६ रोजी हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ६० ते ७० बालकांनी विविध वेशभूषा करून सहभाग घेतला.
गणेशधाम नागरीक समीती तर्फे दर वर्षीप्रमाणेच या वर्षी देखील दि. ११ सप्टेंबर २०२६ ला शिव मंदिर प्रांगणामधे तान्हा पोळा हर्षोल्लासात साजरा केला गेला. यामध्ये एकुण साठ ते सत्तर बालकांनी विविध वेशभूषा करून व आपले लाकडी नंदी बैल सजवून सहभाग घेतला. काही बालकांनी छत्रपती शिवाजी महाराज, मल्हारी मार्तंड, शेतकरी आणि नरसिंह यांचे वेश धारण केले होते.
वेषभूषा स्पर्धेत पहिले पारितोषिक चि. जय गोस्वामी याला, दुसरे पारितोषिकहर्ष धकाते याला व तिसरे पारितोषिक चि. भाविक शाह याला मिळाले. नंदी सजावट स्पर्धेत पहिले पारितोषिक युवान काळे याला, दुसरे पारितोषिक भांदककर हिला व तिसरे पारितोषिक श्रेयांस धकाते याला मिळाले.बक्षिस वितरण अरूण कामिलकर, संजय पेठकर, विलास देशपांडे, नामदेव बडकेलवार, सुनिल बेलखेडे व अनिल देविकर यांनी केले. आजच्या स्पर्धेत न्यायाधीश म्हणून पौर्णिमा बॅनर्जी, शोभा अंबोलीकर, दीपमाला डेकाटे, जयश्री बाली व नयना बिरोले यांनी काम पाहिले..पुजा व्यवस्था प्रविण बडकेलवार, प्रसाद आरवे, व भूपेश लोखंडे यांनी केली. ध्वनीव्यवस्था मंगेश बाली यांनी केली, तर मंच संचालन सारंग टोपरे यांनी केले.
नागपूर: शासकीय प्रेस सोसायटीतील आदिशक्ती माँ दुर्गा उत्सव मंडळातर्फे पाचव्या वर्षानिमित्त नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. या उत्सवात विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नागपूर: रोहिणी पाटील रामटेके यांचा इस्तंबूल येथे आयोजित आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर गौरव करण्यात आला. साक्षात सक्षमीकरण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षे सुनीता पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
नागपूर, 6 ऑक्टोबर 2026: एम. पी. देव मेमोरियल सायन्स कॉलेजने डॉ. अशोक शेकदार स्मृती अंतर्गत एक महत्त्वाची पॉवर पॉईंट सादरीकरण स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत नागपूर आणि अमरावती विभागातील विविध महाविद्यालयांनी सहभाग घेतला.