नागपूर:
प्रतापनगर शिक्षण संस्थेद्वारा संचालित प्रतापनगर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडत अध्यापनासह शालेय कामकाजाचा अनुभव घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. मुख्याध्यापिका सुनंदा गौरकर यांनी शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. प्रमुख वक्त्या धनश्री तरासे यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. गौरकर यांनी शिस्त, अनुशासन व सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे संचालन प्राजक्ता चिकटे यांनी केले. अंकिता शिरसाट यांनी आभार मानले. शिक्षक, विद्यार्थी तसेच विद्यार्थी मुख्याध्यापिका रीना पंचेश्वर, उपमुख्याध्यापिका निशिता कडू यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.


