कामठी 

सेठ केसरीमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी भव्या पोरवाल याची राज्यस्तरीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली. २२ ते २४ सप्टेंबरदरम्यान रामनगर येथील एमएसएलटीए टेनिस कोर्टवर झालेल्या विभागीय शालेय स्पर्धेत भव्या याने दमदार कामगिरी केली.उपांत्य फेरीत त्याने आलोक मिश्रा याचा टायब्रेकरमध्ये ७-४ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात मनवेंद्र त्रिवेदी याच्यावर टायब्रेकरमध्ये ८-६ असा विजय मिळवत भव्या याने विजेतेपद पटकावले. त्याला प्रा. डॉ. मल्लिका नागपुरे यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य डॉ. स्वप्नील दहात, उपप्राचार्य प्रा. विश्वनाथ वंजारी, पर्यवेक्षक प्रा. नरेंद्र मेंढे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.