नागपूर:
महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५ लाख रुपयांची मदत दिली. महासंघाचे महामंत्री अरुण पिवळ यांनी १८ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र वीज निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघाचे महामंत्री शंकर पहाडे, महासंघाचे कार्यकारिणी सदस्य दत्ता धामणकर, निवासी सचिव दत्तात्रय न्हावकर, निर्मितीचे कार्याध्यक्ष वसंत काळे आणि उपमहामंत्री अनंत जाधव उपस्थित होते.महासंघाची परंपरानैसर्गिक आपत्तीच्या काळात शासन आणि जनतेच्या पाठीशी उभे राहण्याची परंपरा महासंघाने कायम राखली आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.



