नागपूर:
गोवारी युवकांनी केवळ शासकीय नोकरीच्या मागे न लागता स्वावलंबनातून स्वयंरोजगार उभारावा आणि इतरांनाही रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन श्रीगुरुदेव युवामंचाचे प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक यांनी केले.
गोवारी स्मारक परिसरात आयोजित ११४ गोवारी शहिदांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात ज्ञानेश्वर रक्षक यांनी युवकांना वाचनाची आवड जोपासण्यास, व्यसनांपासून दूर राहण्यास आणि संत-महापुरुषांच्या विचारांतून प्रेरणा घेण्यास सांगितले.
श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने चंद्रभान राऊत दादा यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित विश्वशांती व मानवी कल्याणाच्या सामुदायिक प्रार्थनेतून शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.ज्ञानेश्वर रक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार, गोवारी युवकांनी आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक पाऊल उचलले पाहिजे. हे केवळ त्यांच्या वैयक्तिक विकासासाठीच नाही, तर संपूर्ण समाजासाठी उपयुक्त ठरेल.



