नागपूर ,

भारत सरकारच्या राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष श्री. हरदीपसिंग गिल यांची विविध राज्यांतील शिष्टमंडळाने भेट घेऊन अनुसूचित जाती समाजाच्या प्रलंबित मागण्या व विविध सामाजिक प्रश्नांबाबत निवेदन सादर केले.


यावेळी तेलंगणाचे राजेंद्र जनजोड, महाराष्ट्राचे डॉ. दीपक शेंडेकर, डॉ. मिलिंद वाचनेकर, अविनाश झंझोटे, पंजाबचे प्रोचाजी चावला तसेच विविध राज्यांतील सामाजिक कार्यकर्ते व प्रतिनिधी उपस्थित होते.समाजाच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंती शिष्टमंडळाने केली. आयोगाकडून सकारात्मक कार्यवाही होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.