सत्यसाई बहुद्देशीय संस्थेचा 'गंध आपुलकीचा' कार्यक्रम

सत्यसाई बहुद्देशीय संस्थेद्वारा संचालित 'साई सावली वृद्धाश्रम' या अंतर्गत 'गंध आपुलकीचा' हा ऋणानुबंधचा एक आगळा-वेगळा कार्यक्रम 22 नोव्हेंबर रोजी पांढरकवडा या भागात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सीबला, पांढरवाणी आणि गोदामपोड या दुर्गम वस्तीतील कोलाम आदिवासी लोकांना मदतीचा हात देण्यात आला.

या उपक्रमात 400 लोकवस्तीच्या आदिवासी कुटुंबांना एक साडी, शर्ट-पॅन्ट, ब्लँकेट व दिवाळी फराळाचे पॅकेट वितरित करण्यात आले. या कार्यक्रमात नगरसेविका विशाखा मोहोड यांनी स्थानिक कुमारी माताशी संवाद साधत त्यांच्या मुलांना शिकविण्याचा सल्ला दिला. धर्मांतर रोखणे ,आपल्या धर्माचे 

 पालन करणे कसे योग्य आहे ते समजाविले.मुलांच्या शिक्षणात मदत करण्याचे आश्वासन दिले.या कार्यात अनेक दात्यांनी मदत केली .


या प्रकल्पाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांचे स्थानिक प्रचारक अमित, पुनाजीत कुळमेथे आणि अतुलआत्राम यांचे सहकार्य लाभले. संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या यशासाठी खूप मेहनत घेतली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनोद केळझरकर, रवींद्र गीते, उदय लाड, हेमंत डुमरे, अभिजित मस्के, तीर्थराज बोबडे, पंकज डोंगरे,कावळे, आशीष केळझरकर, अनंत कदम आणि अभिजित कथाळे यांची मदत मिळालीसंस्थेच्या सचिव नगरसेविका विशाखा मोहोड यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले आणि कार्यक्रमाच्या यशासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले.