म्हाळगी नगरात महिला दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न
नागपूर :
म्हाळगी नगर येथेआंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ५ वाजता दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
या कार्यक्रमात डॉ. अलंकार रामटेके हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर अध्यक्षस्थान प्रभाकर सव्वालाखे यांनी भूषविले. यावेळी मंडळाचे सचिव डॉ. दीपक शेंडेकर, वनिता महात्मे, पुष्पा टोंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. रामटेके यांनी महिलांमध्ये आढळणाऱ्या संभाव्य आजारांवर मार्गदर्शन करत आरोग्याविषयी जागरूकतेचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या मार्गदर्शनाचा महिलांना मोठा लाभ झाला.
लोकमंच ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे आयोजित या कार्यक्रमामुळे परिसरातील महिलांना एकत्र येऊन त्यांच्या समस्या आणि मुद्द्यांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ मिळाले. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
कार्यक्रमाचे संचालन सौ. थिगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. दीपक शेंडेकर यांनी मानले. कार्यक्रमाला कल्पना घटाटे, सुमन टेंबरे, पुष्पा कनोजे, चंद्रशेखर पाध्ये, ज्ञानेश्वर टोंगे, काशिनाथ गुमगांवकर, भालचंद्र सबळ, ईश्वर वानकर, अशोक पाचपोर, विश्वनाथ मोहाडीकर आदी उपस्थित होते.



