नागपूर, 

स्पर्श फाउंडेशनतर्फे कोजागिरी पौर्णिमा उत्सव नाना-नानी पार्क, रामनगर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवात संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये स्तोत्र पठण, गीतगायन, गरबा नृत्य आणि स्वाती सुरंगळीकर यांचे काव्य सादरीकरण यांचा समावेश होता. उपस्थितांनी भोजन व आटवलेल्या दुधाचा आनंद घेतला.या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष शशिकांत सुरंगळीकर, उपाध्यक्ष श्रुती देशपांडे, सचिव प्रवीण मुळे व कोषाध्यक्ष सुनील व्यवहारे उपस्थित होते. सूत्रसंचालन विलासिनी नायर यांनी केले, तर आभार सुनील व्यवहारे यांनी मानले.स्पर्श फाउंडेशन आपल्या कार्यामध्ये वैद्यकीय सेवा, रोजगारनिर्मिती, जलसंवर्धन, मरणोत्तर सेवा आणि संस्कार वर्ग यासारखे विविध सामाजिक उपक्रम राबवते. या उपक्रमांद्वारे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे.