नागपूर
ग्रामायण प्रतिष्ठानच्या एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाची आज सुरुवात झाली उपक्रमाचे नाव NGO कट्टा.डीडोळकर सभागृह पांडे लेआउट येथे हा कार्यक्रम झाला.
ग्रामायण प्रतिष्ठानने एनजीओ कट्टा या नावाने एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. अर्थातच एनजीओचे सक्षमीकरण व्हावे याच हेतूने. एनजीओ च्या पदाधिकारी /कार्यकर्त्यांचे एकत्रिकरण व्हावे आणि चालू असलेल्या उपक्रमांच्या माहितीचे आदान प्रदान व्हावे हा ग्रामायण कट्ट्याचा मुख्य उद्देश होता एकमेकांच्या संपर्काने प्रत्येकाच्या कार्याची प्रगती होत जाईल.या उपक्रमाचा हा पहिलाच कार्यक्रम होता. आज 13 संस्थांचे एकूण 23 जण उपक्रमात सहभागी झाले. एनजीओ कट्टा दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी घेण्यात येणार आहे.



