नागपूर,

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अंधश्रद्धेला विरोध करून समाजाला राष्ट्रभक्तीची दिशा दिली. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा अभ्यास करून संस्कारक्षम व्हावे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. विजय खंडाळ यांनी केले.

श्रीगुरुदेव युवामंचातर्फे राष्ट्रसंतांच्या पुण्यस्मृतिनिमित्त राष्ट्रीय गीतांच्या समूहगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. कमलकिशोर फुटाणे यांनी संत-महापुरुषांकडे जात-धर्माच्या चौकटीतून न पाहता त्यांच्या मानवकल्याणाच्या कार्याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.स्पर्धेत साऊथ पब्लिक स्कूल, ओंकारनगर प्रथम, अमित इंग्लिश प्रायमरी स्कूल, दिघोरी द्वितीय, तर विदर्भ बुनियादी हायस्कूल, ओमनगर तृतीय ठरले. स्पर्धेत ११ शाळांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देण्यात आले.