नागपूर,

 दिवाळीच्या पावन पर्वानिमित्त स्वावलंबी नगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून ‘एक दिवा आपल्या राजासाठी’ हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून विधिवत पूजन करण्यात आले. तसेच महाराजांच्या चरणी दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. आपल्या आराध्य दैवताच्या स्मृतींना उजाळा देत महाराजांप्रती आदर, श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विवेक मेंढी आणि अविनाश घारोडे उपस्थित होते. ‘दिवाळीचा एक दिवा आपल्या राजासाठी’ या संकल्पनेतून शिवरायांच्या विचारांचा आणि स्वराज्याच्या प्रेरणेचा जागर करण्यात आला.