नागपूर -
तब्बल ४५ वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमठवणारे ‘इंसानियत गिर गई है’ हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर सादर होणार आहे. कलासागर बहुभाषी नाट्य महोत्सवात गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता स्व. रामगोपाल माहेश्वरी सांस्कृतिक सभागृह, हिंदी मोरभवन, सीताबर्डी येथे या नाटकाचा प्रयोग होईल.
हे नाटक १९८० मध्ये प्रथम मंचित झालेले असून, दिवंगत हिंदी नाटककार व अभिनेते मुजीब सिद्दीकी यांची कलाकृती आहे. या नाटकात गरीबी-श्रीमंती, स्पृश्य-अस्पृश्यता, बेरोजगारी तसेच जाती-धर्मांच्या भिंतींमध्ये विभागलेला समाज, अशा ज्वलंत विषयांवर भाष्य केले आहे. पथनाट्याच्या स्वरूपातही सादर करता येणे हे या नाटकाचे वैशिष्ट्य आहे.या नाटकात प्रकाश जाधव, ज्ञानेश्वर रक्षक, सुरेंद्र हरडे, रोहन शेळके आणि प्राशु गोखले भूमिका साकारणार आहेत, तर सुरेश सांगोलकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. १९८० मधील पहिल्या प्रयोगाच्या आठवणी जागवणारे दुर्मिळ छायाचित्रे आजही उपलब्ध आहेत. जुन्या कलाकृतीला नव्या पिढीसमोर सादर करण्याचा प्रयत्न कलासागरने केला आहे.आजच्या सामाजिक परिस्थितीतही या नाटकातील विषयांचे महत्त्व कायम असल्याने रसिकांनी या नाट्यप्रयोगाला उपस्थित राहून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन कलासागरतर्फे करण्यात आले आहे.



